ज्येष्ठ नागरिकाचे हक्क व कायदा
![इमेज](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhwKKSBx-9bTqd3ej9QpiarpM9obwx9S7GqniZgh2M8bhn9UNR6ko2aAvcR1yHHDHcEZ-z0m9VJpLVEGmQPCSTi8YgYoz7BGcbBaeLNRMy7NaupOiWtOMrF8ctXWN9rQIytqK_-0Iol_Zgu/s1600/1679405190742333-0.png)
ज्येष्ठ नागरिकाचे हक्क व कायदा भारतीय समाजात जेष्ठ लोकांना नेहमीच मानसन्मान आदर दिला जातो ही भारतीय समाजाची पूर्वपार चालत आलेली ओळख आहे. पूर्वी घरातील जेष्ठांचे अनुभव सल्ले मार्गदर्शन त्यांचा आदर करण्याचे संस्कार आपल्यावर केले जातात. परंतु आजच्या या आधुनिक युगात प्रत्येक जण आपल्या कामात आणि धावपळीच्या आयुष्यात आपल्या कुटुंबाकडे तसेच कुटुंबातील सदस्यांकडे लक्ष देत नाही. या सगळ्यांमध्ये जेष्ठ असणाऱ्या व्यक्तींना याचा सर्वाधिक त्रास होतो. यामुळे वाद विवाद तक्रारी कुरबुरी चालू होतात ज्येष्ठ व्यक्तींकडे योग्य ते लक्ष व वेळ न दिल्या गेल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच ज्येष्ठ नागरिकांचे हक्काचे यामधून हनन होत असते. या सगळ्यांना आळा घालण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक अधिनियम, २००७ आणण्यात आलेला आहे यामध्ये ज्येष्ठांची देखभाल आणि कल्याण अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांच्या हक्काचे संरक्षण केले गेले आहे. जे नागरिक ६० वर्षे पूर्ण करतात ते ज्येष्ठ नागरिक कायद्याअंतर्गत येतात. ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत ज्येष्ठ नागरिकाचे हक्क खालीलप्...