ज्येष्ठ नागरिकाचे हक्क व कायदा


ज्येष्ठ नागरिकाचे हक्क व कायदा 

भारतीय समाजात जेष्ठ लोकांना नेहमीच मानसन्मान आदर दिला जातो ही भारतीय समाजाची पूर्वपार चालत आलेली ओळख आहे. पूर्वी घरातील जेष्ठांचे अनुभव सल्ले मार्गदर्शन त्यांचा आदर करण्याचे संस्कार आपल्यावर केले जातात. परंतु आजच्या या आधुनिक युगात प्रत्येक जण आपल्या कामात आणि धावपळीच्या आयुष्यात आपल्या कुटुंबाकडे तसेच कुटुंबातील सदस्यांकडे लक्ष देत नाही. या सगळ्यांमध्ये जेष्ठ असणाऱ्या व्यक्तींना याचा सर्वाधिक त्रास होतो. यामुळे वाद विवाद तक्रारी कुरबुरी चालू होतात ज्येष्ठ व्यक्तींकडे योग्य ते लक्ष व वेळ न दिल्या गेल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच ज्येष्ठ नागरिकांचे हक्काचे यामधून हनन होत असते. या सगळ्यांना आळा घालण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक अधिनियम, २००७ आणण्यात आलेला आहे यामध्ये ज्येष्ठांची देखभाल आणि कल्याण अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांच्या हक्काचे संरक्षण केले गेले आहे. जे नागरिक ६० वर्षे पूर्ण करतात ते ज्येष्ठ नागरिक कायद्याअंतर्गत येतात.


 ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत ज्येष्ठ नागरिकाचे हक्क खालीलप्रमाणे आहे 

  1.  जर ज्येष्ठ नागरिकांना अपत्य नसेल तर त्यांच्या पश्चात त्यांची संपत्ती त्यांच्या ज्या वारसांना मिळणार आहे त्या   वारसांकडून ज्येष्ठ नागरिक देखभालीसाठी मागणी करू शकतात. 
  2.   तसेच यासाठी स्वतंत्र लवादाची स्थापना करण्यात आलेली आहे यामध्ये SDO दर्जाचे अधिकारी म्हणजेच     उपविभागीय अधिकारी याचे प्रमुख असतात अधिकाऱ्यांकडे ज्येष्ठ नागरिक तक्रार करू शकतात.
  3.   ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मुलांनी किंवा नातेवाईकांनी जास्तीत जास्त किती पैसे द्यायचे हे लवाद ठरवते तरी    जास्तीत जास्त देखभालीची रक्कम रु.१००००/-देण्याची तरतूद आहे.
  4.  जर एखाद्या व्यक्तीने देखभाल करण्यात कसूर केली तर त्याला ज्येष्ठ नागरिक कायद्यातील तरतुदीनुसार   कारावासाची शिक्षा द्यावी लागेल.
  5.  एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या मालमत्तेचे मृत्यूपत्र किंवा भेटवस्तूद्वारे केलेले हस्तांतरण रद्द करण्याचा   अधिकार आहे.
  6.   ज्येष्ठ नागरिक कायद्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वृद्धाश्रम स्थापन करण्याची तरतूद आहे. अशा   वृद्धाश्रमांमध्ये 150 ज्येष्ठ नागरिकांना आश्रय देण्याची क्षमता असावी.
  7.  राज्य सरकार वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापनासाठी योजना विहित करू शकते, ज्यामध्ये वृद्धाश्रमांद्वारे प्रदान केलेल्या सेवांचे मानक आणि प्रकार समाविष्ट आहेत. सेवांमध्ये वैद्यकीय सेवा आणि मनोरंजनाची साधने यांचा समावेश आहे.
  8. ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय सहाय्य ज्येष्ठ नागरिक कायद्याच्या कलम २०मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय मदतीची तरतूद आहे.
  9. ज्येष्ठ नागरिक आपल्या नातू,नात,मुलगा मुलगी यांच्याकडे देखभालीची मागणी करू शकतात यामध्ये नात आणि नातू हे अल्पवयीन नसावेत.
 या कलमानुसार, राज्य सरकारने याची खात्री करावी: 
  • राज्य सरकारच्या पूर्ण किंवा अंशत: निधी असलेल्या रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी खाटा उपलब्ध करून देण्यात याव्यात.
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांगा असावी.ज्येष्ठ नागरिकांसाठी जुनाट, अंतःस्रावी आणि विकृत रोगांवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
  •  ज्येष्ठ नागरिक कायद्याच्या कलम 22 मध्ये असे नमूद केले आहे की राज्य सरकार जिल्हा दंडाधिकारी यांना अधिकार प्रदान करते आणि कर्तव्ये लादते. पालकांची देखभाल आणि कल्याण आणि ज्येष्ठ नागरिक कायद्यातील तरतुदींची योग्य अंमलबजावणी राज्य सरकारने केली पाहिजे.

ज्येष्ठ नागरिक कायदा हा एक छत्री कायदा आहे ज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा समावेश होतो. हा कायदा ज्येष्ठ नागरिकाच्या हक्कांचे आणि मुलांचे किंवा नातेवाईकांच्या कर्तव्यांचे संरक्षण करतो. या कायद्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या अन्न, आरोग्य सेवा, वस्त्र यासारख्या मूलभूत सुविधांची काळजी नातेवाईकांनी घेणे आवश्यक आहे. या कायद्यात ज्येष्ठ नागरिकांच्या देखभालीसाठी सक्षम तरतूद करण्यात आली आहे. तथापि, या तरतुदी भारतीय राज्यघटनेत आधीच अस्तित्वात होत्या. ज्येष्ठ नागरिक कायदा लागू झाल्यानंतर तरतुदींना कायदेशीर चौकट प्राप्त झाली.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रातील नोंदणीकृत (रजिस्टर) भाडेकरारनामा फायदे

फ्लॅट खरेदी करताना घ्यावयाची काळजी

महाराष्ट्र शारीरिकदृष्ट्या अपंग (विकलांग) पेन्शन योजना 2023 अपंग व्यक्तींसाठी ऑनलाइन अर्ज करा