भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चालू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना चेन्नई येथे होणार आहे.
![इमेज](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhLKxAp4cKvYaGGFnAZ_YeJmmVPvWdXsVClSEvFXBd1IRUJG92F6zISFP4aktK_6zN8AoM1pzn6VUqWOicKvKJqfU_lOjh8UG8Y8t1mSKrjBIQxEd2_YN2Jl6YLX9qG4nPKsmquWWdYSKrA/s1600/1679328212232568-0.png)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चालू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना चेन्नई येथे होणार आहे. एमए चिदंबरम स्टेडियमवर बुधवारी (२२ मार्च) दोन्ही संघ आमनेसामने येतील. मुंबईमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यामध्ये भारताने पाच गडी राखून विजय मिळवला होता. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने विशाखापट्टणममध्ये पुनरागमन करत हा सामना १० गडी राखून जिंकला. आता तिसरा सामना एक प्रकारे फायनल असेल. हा सामना जिंकणारा संघ मालिका आपल्या नावावर करेल. सामन्यापूर्वी तुम्हाला एमए चिदंबरम स्टेडियमशी संबंधित १० रंजक गोष्टी सांगत आहोत… पहिला एकदिवसीय सामना ९ ऑक्टोबर १९८७ रोजी चेन्नई येथे खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा एका धावेने पराभव केला होता या मैदानावरील शेवटची वनडे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात १५ डिसेंबर २०१९ रोजी झाली, ज्यामध्ये टीम इंडियाचा आठ विकेट्सनी पराभव झाला. चेन्नईमध्ये आतापर्यंत २२ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघ १३ सामने खेळला या कालावधीत भारताने सात जिंकले आणि पाच...