भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चालू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना चेन्नई येथे होणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चालू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना चेन्नई येथे होणार आहे. एमए चिदंबरम स्टेडियमवर बुधवारी (२२ मार्च) दोन्ही संघ आमनेसामने येतील. मुंबईमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यामध्ये भारताने पाच गडी राखून विजय मिळवला होता. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने विशाखापट्टणममध्ये पुनरागमन करत हा सामना १० गडी राखून जिंकला. आता तिसरा सामना एक प्रकारे फायनल असेल. हा सामना जिंकणारा संघ मालिका आपल्या नावावर करेल.
सामन्यापूर्वी तुम्हाला एमए चिदंबरम स्टेडियमशी संबंधित १० रंजक गोष्टी सांगत आहोत…
पहिला एकदिवसीय सामना ९ ऑक्टोबर १९८७ रोजी चेन्नई येथे खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा एका धावेने पराभव केला होता
या मैदानावरील शेवटची वनडे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात १५ डिसेंबर २०१९ रोजी झाली, ज्यामध्ये टीम इंडियाचा आठ विकेट्सनी पराभव झाला.
चेन्नईमध्ये आतापर्यंत २२ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघ १३ सामने खेळला या कालावधीत भारताने सात जिंकले आणि पाच हरले. एक सामना अनिर्णित राहिला.
चेन्नईत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १३ वेळा विजय मिळवला आहे. त्याचबरोबर आठ वेळा धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला यश मिळाले आहे.
या मैदानावर नाणेफेक खूप महत्त्वाची आहे. नाणेफेक जिंकणाऱ्या संघांनी १५ सामने जिंकले आहेत. त्याचवेळी पराभूत संघाने केवळ सहा विजय मिळवले आहेत.
२००७ मध्ये आफ्रिका इलेव्हन विरुद्ध ७ बाद ३३७ धावा करून या मैदानावर सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम ACC आशियाई इलेव्हनच्या नावावर आहे.
या मैदानावर केनियाची सर्वात कमी धावसंख्या आहे. २०११ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ती ६९ धावांवर बाद झाली होती.
या मैदानावर वैयक्तिक सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या सईद अन्वरच्या नावावर आहे. अन्वरने १९९७ मध्ये भारताविरुद्ध १९४ धावा केल्या होत्या.
एमए चिदंबरम स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना सरासरी २३१ धावा आहेत.
सर्वात मोठ्या धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या नावावर आहे. त्याने २०१९ मध्ये भारताविरुद्धचा सामना दोन विकेट्सवर २९१ धावा करून जिंकला होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा