भारतातील ग्राहक संरक्षण: गरजा आणि पद्धती
भारतातील ग्राहक संरक्षण: गरजा आणि पद्धती आपण सर्वजण ग्राहक आहोत, आपण अनेक वस्तू खरेदी करत असतो जरी खरेदी करताना आपल्याला विकणाऱ्याच्या शब्दांवरती काही प्रमाणात विश्वास ठेवावा लागतो परंतु वस्तू घरी गेल्यानंतर काही दिवसांनी त्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्यास संबंधित व्यक्तीशी किंवा कंपनीची संपर्क केल्यास आपल्याला योग्य अशी सेवा मिळत नाही तसेच आपल्या मनात आपली कुठेतरी फसवणूक झाल्याची भावना निर्माण होते तसेच आपला वेळ आपला पैसा सुद्धा वाया जातो व आपले कधीही न भरून येणारे नुकसान होते ह्याच गोष्टींचा विचारत घेऊन भारतीय ग्राहक संरक्षण कायदा तयार केला गेलेला आहे.परंतु प्रत्येकाला त्यांच्या ग्राहक हक्कांबद्दल माहिती नाही. भारतातील ग्राहक संरक्षणाबद्दल सर्व जाणून घेण्यासाठी गोष्टी ध्यानात घ्याव्यात.ग्राहक हक्कांबद्दल लोकांना दररोज अधिकाधिक शिक्षित केले जात आहे. हे अयोग्य व चुकीच्या पद्धतीने लोकांची दिशाभूल करून वस्तू विकल्या जातात यातून खरेदी दाराचे नुकसान होते.कंपन्यांनी ग्राहकांच्या हिताची सेवा करणे अपेक्षित आहे परंतु अलीकडच्या काळात ग्राहकांची फसवणूक ...